कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु जर त्यांना केंद्रावर येऊन लस न घेता परतावं लागत असेल तर त्यांना पुन्हा लसीकरणासाठी आणणं जिकीरीचं होईल, असंही मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
मुंबईत कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच साठा आहे. शहरात सध्या फक्त 1 लाख 85 हजार कोरोना लसीचे डोस शिल्लक आहेत, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. तसंच केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिकचा लस पुरवठा करावा. लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस देण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीतीही महापौरांनी व्यक्त केली.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे केंद्राकडे कोरोना लसीसाठी पाठपुरावा करत आहेत. तसंच विरोधी पक्षनेतेही पाठपुरावा करत असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे केंद्राने लवकरात लवकर उपलब्ध करुन देणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातच सध्या लसीकरणात अग्रेसर आहे. पण इथेच लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.
Comments
Loading…