in

खासगी रुग्णालयांकडे लशीचा ५० टक्के साठा

Healthcare cure concept with a hand in blue medical gloves holding Coronavirus, Covid 19 virus, vaccine vial

खासगी क्षेत्रासाठी खुल्या केलेल्या लशीचा साठा खरेदी करण्यात मोठ्या रुग्णालयांची मक्तेदारी निर्माण झाली असून मे महिन्यात खुल्या केलेल्या करोना प्रतिबंध लशीच्या साठ्यापैकी सुमारे ५० टक्के साठा नऊ खासगी रुग्णालयांनी खरेदी केला आहे. नफेखोरीला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रीय लसीकरण धोरणामुळे लशीची उपलब्धता आणि समान वितरण याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाला उत्पादन कंपन्यांकडून पुरवण्यात येणाऱ्या लससाठ्यापैकी ५० टक्के साठा खुल्या बाजारासाठी उपलब्ध करण्याचे धोरण सरकारने १ मेपासून जाहीर केले. मे महिन्यात खासगी क्षेत्राने १ कोटी २० लाख मात्रा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून खरेदी केल्या आहेत. यातील ५० टक्के म्हणजे ६० लाख ५७ हजार मात्रांचा साठा देशातील आरोग्य सेवाक्षेत्रातील नऊ बड्या कंपन्यांनी खरेदी केला आहे. उर्वरित ५० टक्के साठा ३०० खासगी रुग्णालयांनी खरेदी केल्या असून यातील बहुतांश रुग्णालये ही मोठ्या शहरातील आहेत. निमशहरी भागातील तुरळक रुग्णालये यात आहेत.

मे महिन्यात सुमारे आठ कोटी मात्रांची विक्री उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी केली असून यातील ५० टक्के म्हणजे सुमारे ४ कोटी मात्रा केंद्राला प्राप्त झाल्या आहेत, तर राज्यांनी ३३ टक्के (सुमारे २ कोटी ६६ लाख) मात्रा खरेदी केल्या आहेत. खासगी रुग्णालयांना एकूण मात्रांपैकी जवळपास १५ टक्के (१ कोटी २० लाख) मात्रा खरेदी केल्या असल्या तरी या रुग्णालयांची लसीकरणाची क्षमता लक्षात घेता अजून १५ दिवसांचा साठा त्यांच्याकडे शिल्लक आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra corona | दिलासा… राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांचा आकडा वाढला

‘काय सांगावे! स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आधी मिस्टर ब्राऊन यांना ‘भारतरत्न’ दिला जाईल’