in

CoronaVirus | कोरोना महामारीमुळे चार धाम यात्रा रद्द

देशातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रा रद्द करण्यात आली आहे. ही यात्रा 14 मे रोजी सुरू होणार होती. यात्रा रद्द करण्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी माहिती दिली.

यात्रा रद्द करण्यासंदर्भात रावत म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे यात्रा स्थगित करण्यात येत आहे. केवळ पुजाऱ्यांनाच तेथे पुजा करण्याची परवानगी असेल. संपूर्ण देशातील लोकांसाठी चारधाम यात्रा सध्यासाठी रद्द करण्यात येत आहे.

कोरोना काळात यात्रा शक्य नाही. 14 मेरोजी यमुनोत्री मंदिराची कपाटं उघडल्यानंतर ही यात्रा सुरू होणार होती. उत्‍तराखंड सरकारने गेल्या वर्षीही कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चार धाम यात्रा रद्द केली होती. यानंतर राज्य सरकारने एक जुलैपासून श्रद्धाळूंसाठी चारधाम यात्रा सुरू केली होती. तसेच जुलै महिन्याच्या अखेरीस इतर राज्यांतून येणाऱ्या भाविकांनाही सरकारने काही अटींसह परवानगी दिली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो; प्राध्यापकाचा लस घेण्यास नकार

Corona Vaccination | लसीकरणाच्या किंमतीबाबत सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकार