in

CoronaVirus News | कोरोनामुळे एकुलता एक मुलगा गमावला, 15 लाखांची FD मोडून ते दोघ करत आहेत रुग्ण सेवा

देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत.मात्र कोरोनाच्या कठीण काळातही अनेकांनी आपलं दु:ख बाजुला सारून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशीच एक घटना अहमदाबादमध्ये देखील घडली आहे.

रसिक मेहता आणि कल्पना मेहता या दाम्प्यत्याने आपला एकुलता एक मुलगा गमावला आहे. मात्र मुलाच्या मृत्यूनंतर खचून न जाता त्यांनी कोरोनाच्या या महाभयंकर संकटात इतरांचा जीव वाचवण्यासाठी मदतीचा हात दिला आहे. दाम्पत्याने 15 लाखांची एफडी मोडून तो पैसा गरजुंच्या उपचारासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रसिक आणि कल्पना या सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात गरजुंना आवश्यकत ती सर्व मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाख रुपयांची एफडी केली होती. गेल्या वर्षी मेहता दाम्पत्याच्या एकुलत्या एका मुलाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ज्या मुलासाठी त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली तोच मुलगा कोरोनानं त्यांच्यापासून हिरावून नेला. या मुलाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मेहता दामप्त्याने 15 लाख रुपयांची एफडी केली होती. पण मुलाचाच मृत्यू झाला. मग पैशाचं काय करणार. त्यामुळे त्यांनी इतर कुटुंबावर ही वेळ येऊ नये म्हणून हे 15 लाख रुपये कोरोनाच्या रुग्णांवर खर्च करण्याचा निर्णय घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मालदीववरुन परतलेल्या दिशा आणि टायगरला पाहून भडकले यूजर्स

IPL 2021: PBKS vs KKR आज आमने-सामने