in

Coronavirus : लाट वेगाने ओसरतेय; ७४ दिवसांत प्रथमच ७० हजारांवर रुग्ण

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ७०,४२१ रुग्ण आढळून आले आहेत, तर ३,९२१ जणांचा मृत्यू झाला. गेल्या ७४ दिवसांत एवढे कमी रुग्ण प्रथमच आढळले आहेत, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदनात म्हटले. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या २,९५,१०,४१० इतकी झाली आहे.

मागील २४ तासांत १,१९,५०१ रुग्ण कोरोनाच्या आजारातून पूर्ण बरे झाले. देशात पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या २,८१,६२,९४७ इतकी झाली आहे. बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ही समाधानाची बाब आहे. ६ मे रोजी कोरोनाचे सर्वाधिक ४ लाख १४ हजार नवे रुग्ण आढळले होते.

देशात आता एकूण रुग्णांची संख्या दोन कोटी ९५ लाख १० हजार ४१० झाली, दोन महिन्यांनंतर उपचाराधीन रुग्णांची संख्या ९ लाख ७३ हजार १५८ तर एकूण मृत्यूंची संख्या ३,७४,३०५ झाली. उपचाराधीन रुग्णांची संख्या ३.३० टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचा दर ९५.४३ टक्के एवढा झाला आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांपैकी पॉझिटिव्ह येण्याचा दर ४.७२ टक्के आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज निर्णय होणार?

शाळेचा पहिला दिवस घरातूनच; विद्यार्थ्यांची ऑनलाइन हजेरी