in

लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार – नारायण राणे

महाराष्ट्राचं शोषण करणारं हे सरकार असून कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. आपण लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार असून त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड कऱणार असल्याचा खुलासाही नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत असं सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर घणाघाती प्रहार केला आहे. संजय राऊत, महाविकास आघाडी यांच्या कारभारावर त्यांनी कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही”

‘कोरोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार’