in

‘काँग्रेसच्याच पुण्याईवर देश चालतोय, मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज’

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मोदी सरकारच्या आजरवच्या कामगिरीबाबत विचारण्यात आलं असता त्यांनी मोदी सरकारला आत्मचिंतानाची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे. देश काँग्रेसच्याच पुण्याईवर तरला आहे असं सांगताना राऊत यांनी मोदी सरकारला आणखी मेहनत घ्यायची गरज असल्याचं म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली आहेत ही चांगलीच गोष्ट आहे. गेली दोन वर्ष तर कोरोनामध्येच गेली. पण आपण जर नीट अभ्यास केला तर लक्षात येतं की नेहरुंपासून ते अगदी मनमोहन सिंग यांच्यापर्यंत देश काँग्रसेच्याच पुण्याईवर चालतोय. काँग्रेसनं राबवलेल्या योजना आजही आपण पाहत आहोत. त्यामुळे मोदी सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि आणखी मेहनत घेण्याची गरज आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कर्जबुडव्या मेहुल चोक्सीचे कस्टडीतील फोटो आले समोर

बॉलिवूडमधील फोटोग्राफरवर बलात्काराचा आरोप