in

मृत्यूनंतरही अवहेलना कायम… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले २२ मृतदेह

बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोना बाधितांची अवहेलना होत असल्याने स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, याच रुग्णवाहिकेतून नंतर रुग्णांचीही वाहतूक होत असल्याने प्रशासनाला कोरोना संकटावर मात करायची आहे की, त्याचा प्रसार करायचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात कोरोना प्रसाराचा वेग प्रचंड आहे. दिवसागणिक हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे येथील स्वाराती रुग्णालयावर प्रचंड ताण आहे. त्यातच शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीचे कोविड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे.

मात्र, मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी दुपारी चक्क २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मृत रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिली नाही का ? असा सवाल उपस्थित केला जातोय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

PBKS vs KKR: कोलकात्यासमोर 124 धावाचे आव्हान

‘सरकारला दोष देण्यापूर्वी स्वतः कोरोनाचे नियम पाळा’, औरंगाबाद खंडपीठाचे नागरिकांवर ताशेरे