in ,

Corona Vaccine: सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; पाहा लसींचे ‘रेटकार्ड’

खासगी रुग्णालयात 1 मे पासून भारतीयांना 600 रुपये प्रत्येकी कोविशिल्ड लस उपलब्ध होणार आहे. मात्र, जगात या लसीसाठी भारतीयांनाच सर्वाधिक पैसे खर्च करावे लागणार आहेत. सध्या या लसीचे उत्पादन आणि वितरण पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटकडे आहे.

सीरमने पहिले दहा कोटी लसींचे डोस भारत सरकारला 150 रुपयांना दिले होते. आता राज्य सरकारला 400 आणि खासगी हॉस्पिटलला 600 रुपये दराने लसींची खरेदी करावी लागणार आहे. सीरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी ‘कोविशिल्ड लस आम्ही 150 रुपयांत विकली तरी नफ्यात राहू’ असं विधान लस बाजारात येण्यापूर्वी केलं होतं. पण सध्याची स्थिती बघता कोविशिल्ड ही जगात भारतात सर्वात जास्त किंमतीला विकली जाते आहे.

तर, लसींचे उत्पादन करणाऱ्या अन्य कंपन्या एका डोसची किंमत ७०० ते १००० रुपयांच्या दरम्यान ठेऊ शकतात. सध्या भारत सरकारने एका लशीची किंत २५० रुपये ठेवण्याचे ठरवले आहे.

कोविशील्ड रेट कार्ड

भारत : 8 डॉलर्स सौदी : 5.25 डॉलर्स अमेरिका : 4 डॉलर्स ब्राझील : 3.15 डॉलर्स युके: 3 डॉलर्स युरोपियन युनियन: 2.15 ते 3.50 डॉलर्स दक्षिण आफ्रिका : 5.25 डॉलर्स बांगलादेश : 4 डॉलर्स श्रीलंका : 4.50 ते 5 डॉलर्स


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RR vs KKR : नाणेफेक जिंकून राजस्थानचा गोलंदाजीचा निर्णय

Maharashtra Corona Update: चोवीस तासांत ६७, १६७ रुग्ण.. तर ६३,००० कोरोनामुक्त