लक्ष्मी रोडवर सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अॅड. फत्तेचंद रांका यांच्यासह 58 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला गेला आहे. आपत्ती व्यवस्थापन व साथ रोग अधिनियमानुसार विश्रामबाग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा सरकारच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रोडवर गुरुवारी सकाळी साडेदहा ते सव्वा बाराच्या दरम्यान आंदोलन केलं होतं.
Comments
Loading…