in

मालेगावमध्ये दादा भुसेंच्या मुलाचं लग्न; वऱ्हाडाच्या संख्येबाबत गुप्तता पाळण्याचा प्रयत्न

Ajinkya Bhuse and Snehal

राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार व ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा मालेगावी आज ‘ आनंद फार्म, मालेगाव ‘ येथे विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाह सोहळ्याची अतिशय गुप्तता पाळली गेली असून ‘ मोजक्या ‘ नातेवाईकांव्यतिरिक्त ईतर वऱ्हाडी मंडळींना या विवाह सोहळ्यात ‘ नो एन्ट्री ‘ देण्यात आली आहे.

ज्या फार्म मध्ये हा विवाह सोहळा संपन्न होत आहे. त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगी शिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला असून या सोहळ्यात कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.मात्र विशेष अतिथी आणि त्यांचा वाहनांना मात्र परवानगी देण्यात आली असून काही आमदार, खासदार यांच्या गाड्या या गेटमधून सोडण्यात येत आहे..पोलीस व सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता सुरू आहे.राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार एकनाथ शिंदे या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद देणार आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bank Holidays ;मे महिन्यात 9 दिवस बंद राहणार बँका

मालदीववरुन परतलेल्या दिशा आणि टायगरला पाहून भडकले यूजर्स