in

व्वा सूनबाई… सासऱ्यांना पाठीवर घेऊन गाठलं रुग्णालय!

कोरोना वैश्विक माहामारीच्या संकट काळात आरोग्य यंत्रणेसह रक्ताचे नातलगही हतबल झाले आहेत. काही ठिकाणी मुलांनी आपल्या वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला, तर कुठे आई-वडील आपल्या कोरोनाबाधित मुलाला रुग्णालयात सोडून फरार झाल्याच्या घटना समोर आल्या.

७५ वर्षीय कोरोनाबाधित सासऱ्यांना रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळत नसल्याने सुनेने आपल्या सासऱ्यांना चक्क पाठीवर घेऊन रुग्णालय गाठलं. या सूनबाईंचं नाव निहारिका असे आहे. तर सासऱ्यांचं नाव थुलेश्वर आहे.

कोरोबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना होण्याची शक्यता अधिक असते. पण प्रशासनाच्या ढिल्या कारभारामुळे सासऱ्यांना पाठीवर घेऊन जाण्याशिवाय कोणताच पर्याय निहारिका यांच्यासमोर नव्हता. अखेर त्यांनी सासऱ्यांना पाठीवर घेऊन रुग्णालय गाठले. मात्र, यामुळे आता निहारिका यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Olympic; कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

वसई विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता