राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावामुळे शनिवार-रविवार विकेंड लॉकडाऊन आणि इतर दिवशी संचारबंदी आणि जमावबंदी लागू केली आहे. मात्र या निर्बंधाचा जनमाणसावर परिणाम होत आहे. व्यावसायिक रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे राज्यात निर्बध विचार न करता लावल्याचा शाब्दिक हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर केला.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, लॉकडाऊनमुळे व्यापारी, व्यावसायिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. त्यामुले व्यापाऱ्यांशी चर्चा करून सरकारने मार्ग काढावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधाना विरोध नाही मात्र सध्याचे निर्बध विचार न करता लावले असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली.
राज्याला आवश्यक लसीचा पूरवठा केंद्राकडून केला जात आहे. सर्वाधिक लसी महाराष्ट्राला मिळाल्या असल्याचा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला.रेमडेसीवीरचा राज्यात काळा बाजार होत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकारावर त्वरित कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Comments
Loading…