in

शेतीसाठी विहिर खोदली; पाण्यात आढळला मृतदेह

सांगलीत एका शेतकऱ्याने शेतात विहिर खोदली. विहिर तयार झाल्याच्या काही दिवसातच त्याच्या विहिरीत प्लास्टिकच्या कागदात गुंडाळलेला मृतदेह आढळल्याची घटना घडली आहे. दरम्यान स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला.

सांगलीच्या तासगाव-निमणी रस्त्यालगत चेतना पेट्रोल पंपाजवळ सुभाष लुगडे यांची शेतजमीन आहे. सुभाष यांनी आपल्या शेतात नुकतीच नवी विहीर बनवली होती. पण या विहीरीत त्यांनी आज संध्याकाळी प्लास्टिक आणि कागदात गुंडाळलेला मृतदेह तरंगताना बघितला. त्यांनी तातडीने याबाबतची माहिती तासगाव पोलिसांना दिली या घटनेबाबतची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले.

स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. मृतदेह पाहिल्यानंतर खून करून हा मृतदेह विहिरीत टाकला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अद्याप मृतदेह कोणाचा याबाबत ओळख पटलेली नाही. याबाबत अधिक तपास तासगाव पोलिसांकडून सुरु आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Cabinet Meeting : शेतकऱ्यांना दिलासा… कॅबिनेटचे ६ मोठे निर्णय

Monsoon 2021 | रायगडात पावसाचा जोर नाही मात्र रेड अलर्ट कायम