in

सांगलीत विहिरीत मृतदेह सापडला

सांगलीतील तासगाव निमणी रस्त्यालगत विहिरीत मृतदेह सापडला आहे. कागदी तळवटात गुंडाळून हा मृतदेह विहिरीत टाकण्यात आला आहे. खून करून मृतदेह टाकल्याचा संशय व्यक्त होत असून याबाबत अधिक तपास तासगाव पोलिसांकडून सुरू आहे.

तासगाव ते निमणी रस्त्यालगत चेतना पेट्रोल पंपाजवळ सुभाष लुगडे यांची शेतजमीन आहे. या जमिनीत नव्याने एक विहीर पाडण्यात आली आहे. या विहिरीत गुरुवारी सायंकाळी प्लास्टिक कागदात गुंडाळलेला एक मृतदेह तरंगताना शेत मालकांना दिसला. त्यानंतर त्यांनी तातडीने तासगाव पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. स्पेशल रेस्क्यू फोर्स च्या मदतीने मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. मृतदेह पाहिल्यानंतर खून करून हा मृतदेह विहिरीत टाकला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अद्याप मृतदेह कोणाचा याबाबत ओळख पटलेली नाही. याबाबत अधिक तपास अधिक तपास तासगाव पोलिसांकडून करण्यात येत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यातील पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार

दहिसरमध्ये चार घर कोसळल्याची घटना; एकाचा मृत्यू,लहान मुलांचा मृत्यू