in

IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी सामना

DELHI CAPITALS VS ROYAL CHALLENGERS BANGLORE

आयपीएल 2021 स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने सलग चार सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या बंगळुरुला रविवारी चेन्नईने धूळ चारली.

69 धावांनी चेन्नईने विराटसेनेला नमवलं. तर दिल्लीची टीमही चांगलीच फॉर्मात आहे. 5 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत दिल्लीचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज बंगळुरुला नमवून दिल्लीचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न करेल. तर बंगळुरुचा संघ मागील पराभव विसरुन दिल्लीला धूळ चारण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

1 तारखेला लसीकरण कसे करावे; यावर राजेश टोपेंनी व्यक्त केली चिंता

मुंबईतील जाहिरात कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड; राजकीय पक्षाच्या बड्या नेत्याची जाहिरातीत टिंगल