in

सनराईज रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. निकिता त्रेहान यांच्यावर कारवाईची मागणी

भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराईज रुग्णालयाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग पूर्णपणे अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या घटनेत 70 जणांना वाचवण्यात यश आले असले तरी 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

या रुग्णालयातील अग्निरोधक सुरक्षाविषयी वारंवार तक्रारी करूनही त्यासंदर्भात कार्यवाही झाली नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे या रुग्णालयाच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. निकिता त्रेहान यांच्यावर कारवाई का झाली नाही? असा सवाल केला जात आहे. डॉ. निकिता त्रेहान या एचडीआयएलचे चेअरमन राकेश वाधवान यांच्या कन्या आहेत. राकेश वाधवान हे पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Deepali Chavan Suicide ; कुटुंबियांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

India Vs England 2nd ODI : भारत – इंग्लंडमध्ये आज दुसरा वन डे सामना