in

‘फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्र्यांनी वेळ वाया घालवला’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला. यावेळी ते महत्वाच्या मुद्यावर बोलतील असं वाटलं होतं. मात्र, त्यांनी वेळ वाया घालवला, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

‘राज्यातील वाढते रुग्ण, त्यावर सरकार राबवत असलेल्या उपाययोजना, शासनाचं याबाबतीत धोरण यासारख्या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलणं अपेक्षित होतं. मात्र, ते केवळ विरोधक आणि त्यांना सल्ला देणाऱ्यांना टोला लगावत राहिले. फेसबुक लाईव्ह करून मुख्यमंत्री ठाकरेंनी वेळ वाया घालवला, असंही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांचं आव्हाडांना प्रत्युत्तर –

जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झाला आहे. केंद्र सरकारनं राज्याला 20 लाख कोटींचं पॅकेज दिलं आहे, असा दावा फडणवीसांनी केला आहे. जगातील इतर देशांमध्ये कोरोना संकटकाळात तेथील केंद्र सरकारनं संबंधित राज्य सरकारांना मदत केली आहे. फडणवीस यांनी आपलं वजन वापरून काही जमतं का बघावं, असंही आव्हाड म्हणाले होते. त्यालाच आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा उल्लेख ‘मराठा आक्रमक’

Gold Rate : पाहा सोन्या चांदीचे आजचे दर