in

देवेंद्र फडणवीसांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण मात्र गुलदस्त्यात

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. या भेटीमागचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.

पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे आज देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. दरम्यान या भेटीत नेमकी चर्चा कोणत्या मुद्यावर झाली आहे, याची अद्याप माहिती मिळू शकली नाही आहे. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठाकरे सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Gold Silver Price | सोने-चांदीच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचे दर