सुप्रिम कोर्टाने आज महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुखांची याचिका फेटाळून लावत मोठा धक्का दिला. त्यामुळे आता देशमुखांची सीबीआय चौकशी होणार आहे, हे निश्चित झाले आहे. यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीत खरं-खोटं बाहेर येईलच असे म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, उच्च न्यायालयाने अतिशय स्पिकिंग ऑर्डर दिली होती. ज्याप्रकारे हे प्रकरण आहे त्यानुसार सीबीआयने चौकशी करावं, असं उच्च न्यायालयाने कारणासह सांगितलं होतं. तरीही राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला. अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात गेले. मात्र महाविकास आघाडीचे नेते याबाबत जे बोलत होते त्यांना उत्तर देण्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलीय.
पुढे ते म्हणाले, या प्रकरणात आता योग्यप्रकारे चौकशी होईल. त्यातून काय खरं-खोटं ते बाहेर येईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे आम्ही स्वागत करतो”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Comments
Loading…