in

”केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही”, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

कोरोना महामारीत केंद्राने ऑक्सिजन, व्हेंटिलेटरचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला दिला. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन केले, राज्याने सुद्धा करावे. वारंवार केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिकच्या रुग्णालयाला भेट दीली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या अडचणी असल्याचे म्हणत यासबंधित विभागीय आयुक्ताना भेटलो. आठवड्याला दोन जास्तीचे टँकर मागवून घेतली आहे. नाशिकमध्ये रेमडेसिव्हीरचा पुरवठा वाढला पाहीजे. सध्या पीएम केअर फंडातून एकूण 4 ऑक्सिजन प्लांट नाशिकमधून मिळत आहेत, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा दुप्पट ऑक्सिजन मिळाला आहे.जिथे बलशाली नेते तिथे ऑक्सिजन, जिथे बलशाली नेते तिथे रेमडेसिव्हीर अशी परिस्थिती असू नये अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. याउलट रुग्णांच्या संख्येनुसार ही व्यवस्था केली पाहिजे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्यांकडे लक्ष दिलंच पाहिजे. पण त्यांनी आपल्याच जिल्ह्याकडे नेलं पाहिजे असं करणे योग्य नाही. पावरफुल नेत्यांना विनंती करतो की जास्त रुग्ण असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मदत करणे गरजेचे आहे, असा सल्ला देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

केंद्र सरकारने सीरमला 3 हजार कोटी आणि भारत बायोटेकला पंधराशे कोटी दिलेले आहे. त्यामुळे आता लसींचं उत्पादन वाढणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लसींची निर्मिती झाल्यामुळे आपण लसीकरणाची मोहीम राबवू शकतो. लसीच्या उत्पादनाच्या सीमा आपण वाढवल्या आहेत, असे फडणवीस म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chandro Tomar Passes Away | ‘शूटर दादी’ चंद्रो तोमर यांचे निधन

PBKS vs RCB Live | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा गोलंदाजीचा निर्णय