in ,

फडणवीसांनी मानले पंतप्रधानांचे आभार…सर्वाधिक ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळाल्याचा दावा

राज्यातील कोरोनाची परिस्थिती ढासळत असताना राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली होती. यामध्ये रेमडेसिवीर, ऑक्सिजनसाठ्या संदर्भात मागणी करण्यात आली होती. यावरू केंद्र आणि राज्यामध्ये राजकारण देखील रंगलं आहे.

अखेर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने राज्याला सर्वाधिक ऑक्सिजन पुरवल्याचा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच, महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदत केल्याचंही त्यांनी या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना सर्वाधिक मदतीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेकाअनेक आभार. महाराष्ट्राला सर्वाधिक १७८५ मेट्रीक टन ऑक्सिजन, जो की गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्यप्रदेश यांच्यासह कोणत्याही प्रमुख राज्याशी तुलना केली तर जवळजवळ दुप्पटीहून अधिक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तुळजाभवानी मातेच्या दरबारात आंब्याची रास

शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया