in

100 कोटींची मागणी तुमच्या समोर केली होती का? हायकोर्टाचा परमबीर सिंग यांना सवाल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरुवात झाली आहे. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी होत आहे. या सुनावणी दरम्यान 100 कोटींची मागणी तुमच्या समोर केली होती का? असा सवाल हायकोर्टाने परमबीर सिंग यांना विचारल आहे.

परमबीर सिंग यांच्यावतीनं विक्रम ननकानी यांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. तर, अ‌ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी हे राज्य सरकारच्या वतीनं बाजूनं मांडत आहेत. राज्य सरकारला या आरोपांमधील तथ्य शोधून काढायचं आहे. आरोपांविषयीचं तथ्य बाहेर आणायचं आहे त्यामुळं ही जनहित याचिका फेटाळावी, असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला. यानंतर न्यायालयानं तथ्य मांडण्यास सांगितलं.

पुढे ननकानी यांनी परमबीर यांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवली. पत्रामध्ये परमबीर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. विक्रम ननकानी यांनी दादरा नगर हवेली खासदार आत्महत्या प्रकरणाचा ही उल्लेख केला. मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणात अनिल देशमुख हस्तक्षेप करत असलाचा परमबीर सिंहचा आरोप आहे. न्यायमूर्ती दत्ता यांच्याकडून एफआयआरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तुम्हाला पोलिसांकडे जाण्यापासून कोणी रोखलं होतं.प्रथमदर्शनी एफआयर नसल्यास तपास होऊ शकत नाही

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई क्राईम इंटेलिजन्स यूनिटची सूत्रं मिलिंद काथे यांच्या हाती

शरद पवारांवर 8-10 दिवसात आणखी एक होणार शस्त्रक्रिया