in ,

Maratha Reservation; भोसले समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर; पुनर्विचार याचिकेकडे आता लक्ष

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकेकडे आता लक्ष लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे ठाकरे सरकारने अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगटाची समिती स्थापन केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी करण्यासाठी या समितीने काम केलं. त्यानुसार या समितीने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, सदस्य दिलीप वळसे पाटील, मुख्य सचिव सीताराम कुंटे, महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी आदी उपस्थित होते.
दरम्यान हा अहवाल अत्यंत सकारात्मक असून आरक्षणप्रश्नावर कोर्टाने उपस्थित केलेल्या अनेक मुद्दयांचा त्यात अभ्यास करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘5जी विरोधातील याचिका पब्लिसिटी स्टंट’ , जुही चावलाला 20 लाखाचा दंड

Tenancy Act : शिवसेनेचा आदर्श भाडेकरू कायद्याला विरोध…मुंबईत विविध ठिकाणी आंदोलनं