in

“प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही”, दिलीप वळसे-पाटलांनी स्वीकारला पदभार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर आता राज्याच्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. आज दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदाचा पदभार सांभाळला. यावेळी प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही असा विश्वास दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

दिलीप वळसे पाटील पुढे म्हणाले, स्वच्छ प्रशासन देण्याच्या दृष्टीने माझं काम राहील. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप माझ्याकडून राहणार नाही. बदल्यांच्या बाबतीत जी व्यवस्था ठरली आहे, त्याप्रमाणे निर्णय घेतले जातील. माझ्या दृष्टीने प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलीस हाऊसिंगसाठी घरं बांधून घेणं या गोष्टी करायच्या आहेत”, असं ते म्हणाले आहेत.

सध्याची परिस्थिती आव्हानात्मक असल्याचं वळसे पाटील यांनी यावेळी मान्य करत, सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील”, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार

दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. “उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय, सीबीआय-एनआयएची चौकशी यामध्ये राज्य सरकारचं पूर्ण सहकार्य राहील. मात्र, न्यायालयाच्या निकालाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे”, असं ते म्हणाले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune Mini Lockdown | पुण्यात व्यापारी वर्ग उतरला रस्त्यावर; भाजपा नेत्यांनी मोडला जमावबंदी चा नियम

“शासनाच्या नियमांनुसारच जयंती साजरी करा”