in ,

रस्त्यावर डॉलरचा पाऊस; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

कॅलिफोर्निया हायवे रस्त्यावर हवेतून डॉलरचा पाऊस सुरू झाला, हे पाहून हायवेवरून जाणारे लोक आपआपल्या गाडीतून उतरली आणि रस्त्यावर नोटा जमा करू लागले. त्यामूळे हायवेवर बराच वेळ ट्रॅफिक झालं होतं. याचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसिद्धीत ‘डेमी बॅग्बी’ नावाच्या बॉडीबिल्डरने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या हातात नोटा घेऊन म्हणाली , “मी आतापर्यंत पाहिलेली ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे. रस्त्यावरून पैसे घेण्यासाठी प्रत्येकजण आपली कार थांबवत आहे.”

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ दक्षिणी कॅलिफोर्नियामधला असून शुक्रवारी सकाळच्या सुमारास हायवेवरून एक ट्रक डिएगो ते फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पच्या दिशेने जात होतं. त्या ट्रकमध्ये ठेवलेल्या अनेक पिशव्या अचानक फुटल्या आणि दक्षिण कॅलिफोर्नियातील या हायवेवर डॉलरच्या नोटा हवेत उधळल्या. त्यानंतर लोकांनी आपल्या गाड्या थांबवून नोटा गोळा केल्या. रस्त्यावरील बहुतांश नोटा या एक डॉलर ते २० डॉलरच्या होत्या. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरपूरच्या वारीहून परतताच केली आत्महत्या; दोन लहान मुलं झाली पोरकी

एसटी कामगार आत्महत्या करतोय, शिवसेनेचा मराठी बाणा कुठे हरवला: राधाकृष्ण विखे