in

विमान प्रवासादरम्यान हवेतच झाला ५२ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग

कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे विमानसेवा मर्यादित झाली असून, तपासणी आणि कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट दाखवल्यानंतरच प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली जात आहे. मात्र दिल्लीतील विमानतळावर कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवून हाँगकाँगसाठी ११८ प्रवासी रवाना झाले होते. मात्र नऊ तासांच्या या प्रवासादरम्यान, तब्बल २२ प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.

४ एप्रिल रोजी विस्तारा फ्लाइटमधून ११८ प्रवासी दिल्लीतून हाँगकाँगसाठी रवाना झाले होते. विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी या सर्वांचे कोरोना रिपोर्ट तपासण्यात आले होते. यामध्ये सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे दिसून आले होते. मात्र विमानाने दिल्लीतून हाँगकाँगसाठी उड्डाण केल्यावर ९ तासांनी ते हाँगकाँगला पोहोचले. तिथे या प्रवाशांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली असता ५२ प्रवाशांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑस्ट्रेलियानं भारतातून येणारी प्रवासी विमानं १५ मेपर्यंत केली रद्द

“मोफत लसीकरणाबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेणार”