in

6 जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर

राज्यातील पाच जिल्ह्यातच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोट निवडणुका 5 ऑक्टोबर 2021 रोजी पार पडणार आहेत. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम व नागपूर जिल्ह्यांतील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या पोट निवडणुका होणार आहेत.

तसेच पालघर जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील त्याच दिवशी मतदान होणार असून सर्व ठिकाणी 6 ऑक्टोबर 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान यांनी केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कोरोना रुग्णांची संख्या व आठवडाभरातील दैनंदिन व मृतांच्या संख्येबाबत अहवाल मागविला होता. त्यावरून या जिल्ह्यांतील कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याचे दिसून आले.

धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूरच्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 22 जून 2021 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमात पालघर जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांचा समावेश करण्यात आलेला नव्हता.कारण, त्यावेळी कोविड संदर्भातील राज्य शासनाच्या निकषानुसार पालघर जिल्ह्याचा समावेश स्तर-3 मध्ये होता. त्यामुळे तेथील पोटनिवडणुका जाहीर केलेल्या नव्हत्या.

दरम्यान, आता मात्र या सर्व निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.मदान त्यांनी स्पष्ट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महानायक अमिताभ बच्चन आणि डॅनी पुन्हा ‘या’ चित्रपटात एकत्र येणार

मुलुंडमध्ये ऑलिम्पिक बाप्पा; तरुणांना खेळांमधील कारकिर्दीसाठी दिले प्रोत्साहन