in

Engineer’s Day 2021;…म्हणून आज अभियंता दिन साजरा केला जातो!

भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले भारतातील पहिले अभियंता सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिवस. त्यांच्या स्मरणार्थ आज देशभरात ‘अभियंता दिवस’ (इंजिनिअर्स डे) म्हणून साजरा केला जातो. आज जाणून घेऊ त्यांची कहाणी…कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील मदनहळ्ळी या अतिदुर्गम खेड्यात 15 सप्टेंबर 1891ला त्यांचा जन्म झाला. इंजिनिअरिंगची अंतिम परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होऊन त्यांनी देशातील पहिले अभियंता (इंजिनिअर) बनण्याचा बहुमान मिळवला.

ते पंधरा वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. घरात आठराविश्व दारिद्र्य होते. शिक्षणास पैसा नाही. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विद्वत्तेच्या जोरावर शिष्यवृत्ती मिळवून बंगळूर येथे प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केले.

एक नजर कारकिर्दीवर :

● वयाच्या 23 वर्षी त्यांना तत्कालिन मुंबई इलाख्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता म्हणून नियुक्ती दिली गेली.
● 1904 साली त्यांना बढती मिळून संपूर्ण देशाचे ते पहिले अभियंता होण्याचा मान मिळाला.
● विशेष म्हणजे तोपर्यंत या पदावर इंग्रज लोकच अभियंता म्हणून काम करत होते.
● आपल्या नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी ठिकठिकाणी 24 वर्षे नोकरी केल्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.
● म्हैसूर संस्थानचे मुख्य अभियंता म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली.
● त्यांनी कृष्णराज सागर हे कावेरी नदीवरील धरणाचे काम पूर्ण केले. त्यांना या कामाचे पारितोषिक म्हणून गौरवार्थ म्हैसूर संस्थानचे दिवानपद बहाल करण्यात आले.

विशेष बाबी :

  1. शेतकर्‍यांची परिस्थिती पाहून त्यांना शेतीचे ज्ञान व्हावे म्हणून म्हैसूर विद्यापीठाची स्थापना सरांनीच केली.
  2. भद्रावती येथील अवाढव्य लोखंड व पोलाद कारखाना हे तर त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचे जिवंत प्रतिक आहे.
  3. एडन शहराच्या पाणीपुरवठा व जलनि:सारणाच्या योजना राबवून इंग्रज अभियंत्यांना आश्चर्यचकित केले होते.
  4. सिंचन क्षेत्रातील ब्लॉक सिस्टीमचा पाया त्यांनी घालून दिला.
  5. महाराष्ट्रातील खडकवासला धरणातील स्वयंचलित दरवाजे ही त्यांचीच देणगी आहे.
  6. वयाच्या 94 व्या वर्षी भारतरत्न या परमोच्च किताबाने देशाने या अभियंत्याचा गौरव केला.

विश्वेश्वरय्या यांनी 14 एप्रिल 1962 ला त्यांनी वयाच्या 101 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. देशाच्या वैभवात भर घालणारी अनेक कामे करणाऱ्या तसेच देशात औद्योगिकीकरणाच्या प्रगतीचा मूहुर्तमेढ रोवणाऱ्या विश्वेश्वरय्या यांना मानाचा मुजरा…

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aayre

Aayre