in

लॉकडाउन काळातील MPSC परीक्षेबाबत स्पष्टीकरण द्या!

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत एमपीएससीने १४ मार्चची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्याविरोधात परीक्षार्थींनी राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय बदलत २१ मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील, असे स्पष्ट केले. एमपीएससीची २१ मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ११ एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या वैभव शितोळे याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.

‘लॉकडाऊन’ असताना रविवारी (ता.११) होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसंच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती, असे ट्विट रोहित पवार यांनी केलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Taimur’s younger brother; अभिनेता रणधीर कपूरने चुकून शेअर केला तैमूरच्या भावाचा फोटो

CJI पदी मुख्य न्यायाधीश NV Ramana