in ,

Sagar Rana Murder : सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

दिल्लीच्या सागर राणा हत्येप्रकरणी अटक झालेल्या सुशील कुमारच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली आहे.

आरोपी सुशील कुमार याची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर तिहार जेल प्रशासनाने शुक्रवारी त्याला रोहिणी कोर्टात हजर केले. दरम्यान, कोर्टाने सुशील कुमार याच्या न्यायालयीन कोठडीत २५ जूनपर्यंत वाढ केली आहे. रोहिणी कोर्टाने सुशील कुमारची तुरुंगात पौष्टिक आहार मिळवून देण्याची विनंती फेटाळून लावली होती.

सुशील कुमारला पौष्टिक आहार पुरवण्याची केलेली मागणी दिल्ली न्यायालयाने फेटाळताना ही ‘अत्यावश्यक गरज’ नसल्याचे नमूद केले. २०१८ च्या दिल्ली कारागृह नियमानुसार तुरुंगात आरोपीच्या प्राथमिक गरजांकडे लक्ष दिले जाते. परंतु पौष्टिक आहार हा कोणत्याही प्रकारे अत्यावश्यक गरज नाही, असे मुख्य महानगर दंडाधिकारी सतवीर सिंग लांबा यांनी सांगितले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपला धक्का; मुकुल रॉय यांची मुलासह ‘टीएमसी’त घरवापसी

Gold Rate| सोने चांदीच्या भावात घसरण