in

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर अडकणार लग्न बंधनात?

गेल्या वर्षात म्हणजे २०२१ मध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी लग्न करत आयुष्याला नवीन सुरुवात केली. आता या नवीन वर्षात ही काही नामवंत कलाकार मंडळी लग्न करण्यासाठी तयार आहेत. लवकरच त्यांच्या घरी सनईचे सूर गुंजणार आहेत. लग्न करण्यामध्ये आघाडीचे नाव आहे फरहान खान आणि शिबानी दांडेकर यांचे आहे.

अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर आणि मराठमोळी मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. ९ जानेवारी रोजी फरहान अख्तरचा वाढदिवस साजराा केला. यानिमित्ताने अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फरहानची मैत्रीण शिबानी दांडेकरनेही त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत तिने काही Unseen फोटोही शेअर केले आहेत.

शिबानी दांडेकरही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. शिबानीने फरहानच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. शिबानीने फरहानसोबतचे पाच फोटो पोस्ट केले आहे. यात त्या दोघांनीही काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यावेळी शिबानीने छान गाऊन परिधान केला आहे. तर फरहानने छान सूट परिधान केल्याचे दिसत आहे.

शिबानीने हे फोटो पोस्ट करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. My Foo, येणारे वर्ष तुझ्यासाठी आणखी खास असणार आहे. लव्ह यू फॉरएव्हर, वाढदिवसाच्या शुभेच्छा, अशी पोस्ट शिबानीने फरहानसाठी लिहिली आहे. विशेष म्हणजे तिने याद्वारे तिने प्रेम आणि शुभेच्छा दोन्हीही व्यक्त केले आहे. शिबानीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. यावर इलियाना डिक्रूझ, आस्था शर्मा, अदिती सिंग शर्मा यांनी फरहानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक कुणाची? चौकशीसाठी समिती स्थापन होणार

‘भूल भुलैया २’मध्ये ‘ही’ अभिनेत्री असणार मोंजोलिका