in ,

अमरावतीत वीज पडून शेतकरी मजुराचा मृत्यू

सूरज दाहाट | अमरावती | विदर्भात आज जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील आजनगाव येथे वीज पडून एका २४ वर्षीय शेत मजुराचा मृत्यू झाला. पुढील तीन दिवस अमरावती जिल्हासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

किरण थाळे वय २४ वर्ष असं मृत मजुराचे नाव असून तो आपल्या सोयाबीनच्या शेतात गेला होता. अशातच विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस झाल्याने त्याच्या अंगावर वीज पडून जागीस मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, नांदगाव खडेंश्वर, अचलपूर, परतवाडा, दर्यापूरसह मेळघाट मध्ये जोरदार पाऊस पडला आहे. या परतीच्या पावसाने मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विदर्भामध्ये शेतकरी सोयाबीन कापणीला लागलेला असून अश्यातच पाऊस येत असल्याने सोयाबीनचे पूर्ण पणे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेलं सोयाबीन आजच्या परतीच्या पावसाने पूर्णपणे भिजले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा निसर्गाने हिरावला आहे. दरम्यान पुढील तीन दिवस अमरावती जिल्हासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“केंद्र सरकारला सामान्य लोकांच्या प्रश्नांसंबंधी आस्था नाही”, शरद पवार

राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच नियुक्त