in

व्हॉट्सअॅप चाट बेतलं जीवावर… पोटच्या मुलींवर बापाने चालवला ट्रक

मुली व्हॉट्सअ‍ॅपवर मुलांशी चॅट करते, म्हणून बापाने पोटच्या दोन्ही मुलींना ट्रकखाली झोपवले आणि त्यांच्या अंगावर ट्रक चालवला. लगेच त्याच चालत्या ट्रकखाली येऊन बापानेही आत्महत्या केली.

मावळ तालुक्यातील इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. नंदिनी भरत भराटे आणि वैष्णवी भरत भराटे अशी दोन मुलींची नावं आहेत. तर भरत ज्ञानदेव भराटे असे वडिलांचे नाव आहे. याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत बापाच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

नंदिनी ही सतत व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्यातरी मुलाशी बोलत होती. यावर राग अनावर झाल्याने भरत याने दोन्ही मुलींना ठार मारण्याच्या उद्देशाने दमदाटी केली. दोन्ही मुलींना भरत याने रस्त्यावर झोपवले. त्यानंतर ट्रक चालू करून मुलींच्या अंगावरून चालवला. ट्रक चालू स्थितीत असताना ट्रकमधून खाली उडी मारुन स्वतः ट्रकच्या समोर झोपून भरत याने आत्महत्या केली. तळेगाव एमआयडीसी पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मनमोहन सिंगांनी सरकारला दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले

Oxygen Express | महाराष्ट्रासाठी ‘ऑक्सिजन एक्सप्रेस, विशाखापट्टणमहून धावणार