भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत देशातील विविध राज्यांमध्ये दौरे करत शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत. रविवारी राजस्थानच्या अबू रोड येथून राकेश टिकैत गुजरातमध्ये दाखल झाले. यावेळी टिकैत यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी शंकर सिंह वाघेला उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करायला हवी, असे टिकैत म्हणाले.
गुजरातमधील शेतकऱ्यांनी आंदोलनात कसे सहभागी व्हायचे, हे तुम्हीच ठरवायला हवे. युवकांनी, तरुण वर्गाने अधिकाधिक संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी व्हायला हवे, असा पुनरुच्चार राकेश टिकैत यांनी यावेळी बोलताना केला. केंद्र सरकार संपूर्ण देशात गुजरात मॉडेल लागू करू इच्छिते, अशी टीका करत रिलायन्सला ६० गावे देऊन टाकली. तसेच देशभरातील शेतकऱ्यांची जमीन कंपनी, व्यवसायिकांना देऊन टाकण्याचा घाट सरकारने घातला आहे, असा दावा टिकैत यांनी केला.
Comments
Loading…