in

Lokshahi Impact | महिला तलाठी गैरवर्तन प्रकरण; प्रांताधिकारी सोपान कासारवर होणार कारवाई

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात महिला तलाठी यांनी बदली संदर्भात गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. या संदर्भातील बातमी ‘लोकशाही’न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर आता विषाखा समितीने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात कार्यरत असलेल्या महिला तलाठ्याकडे प्रांताधिकारी सोपान कासार यांनी शरीर सुखाची मागणी केली होती. संबंधित मागणी महिला तलाठ्यांने फेटाळून लावल्याने तलाठ्याची तालुक्यातून बाहेर बदली केल्याचा आरोप पिडीत महिल तलाठ्याने केला होता. याबाबत संबंधित महिला तलाठ्याने एक व्हिडिओ भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पाठवत, न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. ‘लोकशाही’न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केली होती.

महिलेने उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांच्यावर येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या महिलेची केलेल्या बदलीला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात न बदलास स्टे दिलेला आहे. तसेच सदावर्ते यांनी देखील सोपान कासार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान या प्रकरणात येवल्याचे उपविभागीय अधिकारी सोपान कासार यांच्यावर कार्यवाही करण्याचे विशाखा समितीने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना आदेश दिले आहेत. तर नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे काय कार्यवाही करणार या कडे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; बियॉंड बॉलिवूड संगीताचा नजराणा

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; बियॉंड बॉलिवूड कार्यक्रमाने गणेशभक्त झाले मंत्रमुग्ध