in ,

विरार रुग्णालय आग; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

विरार मधील विजय वल्लभ कोव्हड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे. या अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्ण उपचार घेत होते . त्यापैकी 10 ते 12 रुग्ण जळाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.

या घटनेदरम्यान वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या 10 गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. रुग्णालयातील आग पूर्णपणे विझवण्यात यश आले आहे. मात्र रुग्णालयातील सर्व रुग्ण वसई विरार नालासोपारा परिसरातील वेगवेवेगळ्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

आयसीयू वॉर्डात भीषण आग

विरार पश्चिम भागात विजय वल्लभ कोव्हिड केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता (ICU) विभागात गुरुवारी मध्यरात्री दीड ते शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी रुग्णालयात 90 जण उपचार घेत होते. आयसीयू वॉर्डमध्ये जवळपास 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. आग लागली, त्यावेळी आयसीयूमध्ये वैद्यकीय स्टाफ नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. डॉक्टरांनी मात्र अवघ्या दोन मिनिटात आग भडकल्याचा दावा करत आरोप फेटाळले आहेत. हॉस्पिटलबाहेरील रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा आहे.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची नावे

उमा सुरेश कनगुटकर – स्त्री
निलेश भोईर – पुरुष
पुखराज वल्लभदास वैष्णव – पुरुष
रजनी आर कडू – स्त्री
नरेंद्र शंकर शिंदे – पुरुष
कुमार किशोर दोषी – पुरुष
जनार्धन मोरेश्वर म्हात्रे – पुरुष
रमेश टी उपायन – पुरुष
प्रवीण शिवलाल गौडा – पुरुष
अमेय राजेश राऊत – पुरुष
शमा अरुण म्हात्रे – स्त्री
सुवर्णा एस पितळे – स्त्री
सुप्रिया देशमुख – स्त्री

सध्या ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. तसेच या रुग्णालयातील सर्व रुग्णांना वसई-विरार- नालासोपारा परिसरातील विविध रुग्णालयात हलवण्यात येत आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

RCB Vs RR: विराटसेनेचा विजयी चौकार

लवकरच ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात होणार दाखल