in

पंजाबमध्ये फायटर जेट MG-21 क्रॅश

पंजाबमधील मोगामध्ये रात्री एक वाजता फायटर जेट मिग 21 क्रॅश झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनिंग सुरू असताना पायलट अभिनवने मिग 21 सोबत झेप घेतली. राजस्थानच्या सूरतगढावर मिग 21 झेप घेत होतं. ज्यानंतर हे विमान क्रश झालं. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे.

इंडियन एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार,’मोगाच्या कस्बा बाघापुरानाच्या गावातील लंगियाना खुर्द जवळ हे फायटर जेट मिग 21 रात्री उशिरा क्रॅश झालं. घटनास्थळी प्रशासन आणि सेनेचे अधिकारी पोहोचले आहेत.

पश्चिम क्षेत्रात कोसळल्यानंतर या विमानाचा पालयट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे. हवाईदलाकडून या दु:खद घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आजचे ‘वर्क फ्रॉम होम’ स्वर्गीय राजीव गांधींमुळेच

Tauktae Cyclone | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर