in

शेतकऱ्यांना पीकविमाचा लाभ मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

सततच्या पावसामुळे शेतातील हातात आलेले पिकांचे अतोनात नुकसान झाले. शिवाय या परिस्थितीला कंटाळून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, सिल्लोड तालुक्याची खरीप अंतीम आणेवारी 48 आलेली असताना तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी यांच्या चुकीच्या अहवालामुळे सिल्लोड तालुका पीकविमा पासून वगळण्यात आला.

आधीच नैसर्गिक व कोरोनाच्या संकटात हैराण झालेल्या शेतकरी बांधवावर हा मोठा आघात असल्याने शेतकऱ्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे. यासाठी कामात हलगर्जीपणा व जाणीवपूर्वक पंतप्रधान पीकविमा योजना खरीप 2020 -21 चा पीक कापणी प्रयोगाचा चुकीचा अहवाल देणाऱ्या तत्कालीन तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित यंत्रणेवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, पंतप्रधान पीकविमा योजना खरीप 2020 -21 चा पीक कापणी प्रयोगाचा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी फेर चौकशी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने HDFC ERGO विमा कंपनीने पिकविम्याची नुकसानभरपाई देण्याबाबतचे आदेश देण्यासाठी देविदास पा. लोखंडे यांच्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्येष्ठ विधिज्ञांच्या मार्फत मा. उच्च न्यायालय मुंबईच्या औरंगाबाद खंड पिठात जनहित याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती युवानेते अब्दुल समीर यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Raj Thackeray | “माझ्या भेटिला येऊ नका…”वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला सुरुवात