छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा या नक्षलवादी जिल्ह्यामध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत तर 21 जवान अद्याप बेपत्ता असल्याची नक्षलवादी विरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक ओपी पाल यांनी माहिती दिली आहे. यासोबतच एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. सुमारे तीन तास ही चकमक सुरू होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे की, “माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही.” असे म्हणत दु:ख व्यक्त केले आहे.
Comments
Loading…