in

‘सरकारला दोष देण्यापूर्वी स्वतः कोरोनाचे नियम पाळा’, औरंगाबाद खंडपीठाचे नागरिकांवर ताशेरे

सरकारला दोष देण्यापूर्वी नागरिकांनी स्वतः नियम आणि कोरोनाचे निर्बंध पाळायला हवेत , अशा भाषेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नागरिकांवर ताशेरे ओढले आहेत. राज्यात आणि प्रामुख्यानं मराठवाडा विभागात गंभीर होत असलेल्या कोरोनाच्या स्थितीची दखल घेत, औरंगाबाद खंडपीठानं सुमोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान खंडपीठानं नागरिकांना सुनावलं आहे.

या याचिकेवरील सुनावणीदरम्यान कोर्टानं अनेक महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली आहेत. तसेच काही महत्त्वाचे निर्देश कोर्टानं दिले आहेत. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचारी किंवा डॉक्टरांनी सोबत आधारकारड घेऊन घराबाहेर पडावं असं कोर्टानं म्हटलं आहे. सरकारला दोष देण्यापूर्वी आपण नागरिकांनी संवेदनशीलता दाखवायला हवी. नागरिकांनी शिस्त पाळायला हवी असं कोर्टानं म्हटलं आहे. यंत्रणा आणि धोरण चांगलं असूनही नागरिकामुळं ते उध्वस्त होते असंही कोर्टानं म्हटलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मृत्यूनंतरही अवहेलना कायम… एकाच रुग्णवाहिकेत कोंबले २२ मृतदेह

Viral Video: “कोरोना से डर नहीं लगता साहब पंखे से लगा है”