एटापल्ली तालुक्यात बुर्गी येथील माजी उपसरपंच व विद्यार्थी नेते रामा तलांडी (36) यांची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. ही हत्या रात्री 11 वाजण्याचा सुमारास करण्यात आली.
एका विवाह सोहळ्यात सक्रिय असताना अचानक आलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. रामा यांचा या हल्ल्यात जागीच मृत्यू झाला असून ते सलग दहा वर्षे उपसरपंच होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
Comments
Loading…