in ,

भारताचा ‘या’ माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाणला कोरोनाची लागण झाली आहे. इरफानने स्वत: सोमवारी ट्विटरवरुन ही माहिती दिली. इरफानच्या अगोदर एस. बद्रीनाथ, सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

इरफानने ट्वीट केले की, “कोणतीही लक्षणे नसताना मी करोना चाचणीत पॉझिटिव्ह आलो आहे. मी मी स्वत: ला घरीच आयसोलेट केले आहे. माझ्याशी संपर्क साधलेल्यांनी चाचणी करावी. मी सर्वांना विनंती करतो की मास्क घाला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. स्वत: ची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.”

इरफानपूर्वी, बद्रीनाथ, युसूफ पठाण, आणि सचिन तेंडुलकर यांनीही आपल्या ट्विटमधून करोनाच्या संसर्गाची माहिती दिली. बद्रीनाथ म्हणाला, ”माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला या आजाराची सौम्य लक्षणे आहेत. मी करोनासंबधित नियमांचे पालन करत असून घरी क्वारंटाइन झालो आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी योग्य ती काळजी घेत आहे.”

युसूफ पठाण पॉझिटिव्ह

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पाठोपाठ युसूफ पठाणलाही करोनाचा संसर्ग झाल्याचे शनिवारी रात्री समोर आले. युसूफने स्वतः ट्विट करत याची माहिती दिली आहे. शनिवारी दुपारी सचिन तेंडुलकरला करोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर रात्री युसूफने त्याला करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीचा डोस घेतल्यानंतरही माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला कोरोनाची लागण

भारतीय महिला संघाच्या खेळाडूला कोरोनाची लागण