in

राज्याचे माजी मंत्री संजय देवताळे यांचे कोरोनामुळे निधन

महाराष्ट्राचे माजी पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले आहे. ते चंद्रपूरचे पालमंत्री देखील होते. तसेच वरोरा-भद्रावती विधानसभेचे माजी आमदार होते. नागपुरात कोरोनावरील उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

अभियांत्रिकी चे शिक्षण घेतलेले देवतळे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सक्रिय राजकारणाला सुरुवात केली होती. माजी मंत्री तथा त्यांचे काका दादासाहेब देवतळे यांच्या अकाली निधनानंतर माजी केंद्रीय अर्थ मंत्री व काँग्रेसचे तत्कालीन खासदार शांताराम पोटदुखे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना वरोरा-भद्रावती विधानसभेची उमेदवारी मिळाली.

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अॅड. मोरेश्वर टेमुडे यांचा पराभव करून विजयी झाले होते. सलग २० वर्ष त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. २०१४मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला. तिथून त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईत ऑक्सिजन तुटवड्याचा हायअलर्ट, 2 दिवस पुरेल इतका साठा

तुळजाभवानी मातेच्या दरबारात आंब्याची रास