in ,

Damu Shingada | माजी खासदार दामू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन

डहाणू लोकसभा क्षेत्रातून पाच वेळा खासदारपदी निवडून आलेले दामू शिंगडा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 67 वर्षाचे होते. त्यांच्या या निधनाने राजकिय वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.

दामू शिंगडा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर वसईच्या कार्डिनल ग्रेसर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज कोरोनामुळे त्यांचे निधन झाले.

राजकीय कारकीर्द

१९७९ मध्ये त्यांनी जिल्हा परिषदची निवडणूक जिंकून त्यांच्या कारकिर्दीला प्रारंभ केला होता. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी १९८० मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकली. १९८०, १९८४, १९८९, १९९१ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या दामू शिंगडा यांनी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाची धुरा अनेक वर्ष सांभाळली होती. तत्कालीन ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचे नेतृत्व करताना अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pandharpur Election Results | ”मी करेक्ट कार्यक्रम करतो”; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया…

Belgaum Election Result | भाजपच्या मंगला अंगडी विजयी