in

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांचे निधन

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त धनंजय जाधव यांच्यावर (वय- ७४) हॉस्पिटल मध्ये उपचार चालू असताना निधन झाले आहे. धनंजय जाधव यांच्यावर पुसेगाव (ता. खटाव) या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धनंजय जाधव हे १९७३ सालच्या बॅचमधील आयपीएस अधिकारी होते. १९९२ साली चांगली कामगिरी केल्याबद्धल त्यांना राष्टपतीच्या हस्ते पोलीस पदक प्रदान करण्यात आले होते. धनंजय जाधव यांच्यावर २००७ साली मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी होती. अप्पर पोलीस महासंचालक म्हणून २००२ बढती मिळून सुरक्षा पथकाकच्या प्रमुख पुढची जबाबदारी दिली होती. त्यांनी वर्धा, अहमदनगर, पुणे या ठिकाणी सेवा बजावली आहे.

धनंजय जाधव यांचा जन्म १९४७ सालचा आहे. सातारा जिल्यातील पुसेगाव येथे प्राथमिक शिक्षण झाले. पुढील शिक्षण वाई येथे झाले. पुढे MSC पदव्यूतर पदवी घेतल्यानंतर रायगड येथे शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले होते. याचवेळी MPSC परीक्षा देत १९७२ मध्ये त्यांना यश आले. IPS अधिकारी म्हणून धुळे येथे पहिली नियुक्ती झाली होती. त्यांच्या मागे एक मुलगा व दोन मुली आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

लॉकडाउनसंदर्भात राजेश टोपे म्हणाले…