in

नागपूरचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी हवाई दलाची मदत, विमानाने चार टँकर्स ओदिशाला रवाना

कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. नागपूरचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यासाठी हवाई दलाची मदत घेण्यात आली आहे. ओदिशामधून 60 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार असून नागपूर विमानतळावरुन चार टॅंकर मंगळवारी विमानाने भुवनेश्वरला रवाना करण्यात आले.

मेडिकल ऑक्सिजन भरलेले हे टँकर येत्या तीन दिवसात नागपूरला परत पोहोचतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ओदिशाला टँकर्स घेऊन रवाना झालेल्या विमानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. हवाई दलाचे विमान रात्री 9 वाजता ओदिशासाठी रवाना झाले. भुवनेश्वरपासून 130 किमी दूर असलेल्या अंगुलवरुन दररोज 60 मॅट्रिक टन ऑक्सिजन टॅंकर नागपूरला पोहोचतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘देशात कोरोनाची तिसरी लाट अटळ, तयार राहा’; वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा

‘आता हे पाप मोदी सरकारने निस्तरावे’; मराठा आरक्षणावरून काँग्रेस आक्रमक