in

Fuel price hike| मुंबईकरांना इंधन दरवाढीचा झटका; जाणून घ्या आजचे पेट्रोल – डिझेल दर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून जनता सावरत असतानाचा आता महागाईचे नवे संकट सर्वासमोर ठाकले आहे. आज सकाळी तेल कंपन्यांनी परत एकदा मोठा झटका दिला आहे. शुक्रवारीही इंधनाचे दर वधारलेले होते. आज रविवारी परत एकदा इंधनाचे दर वाढविण्यात आले आहेत. आज पूर्ण देशात पेट्रोलचे दर २६ ते २७ पैसे प्रतिलिटर आणि डिझेलचे दर २९ ते ३१ पैसे प्रतिलिटरने वाढ झाली आहे. दर दिवशी पहाटे सहा वाजता इंधनाचे दर जाहीर केले जाते. आतापर्यंत २० वेळा वाढले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल प्रतिलिटर दर १०१.२५ रुपये आहेत तर राजधानीत ९५.03 रुपये भाव आहेत.

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दोन महिन्यानंतर मोठी कोरोना रूग्णसंख्येत घट

नायजेरियात Twitter वर अनिश्चित काळासाठी बंदी