in

पुण्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पिंपरी चिंचवडमधील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. हा बलात्कार एक गुन्हेगार टोळी केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे . याप्रकरणी 27 ऑगस्टला गुन्हा दाखल झाला असून आज तिच्या आईने घटनाक्रम समोर आणला आहे. नण्या वाघमारे गॅंगमधील हे सराईत बाल गुन्हेगार आहेत. गेल्या वर्षी पासून हा प्रकार सुरुये. पीडित मुलीच्या घरात आपल्या गॅंगच्या सदस्या सोबत बळजबरीने घुसून तिला आणि तिच्या कुटुंबियांना मारहाण देखील केली. तसेच  पीडितेच्या कुटुंबाला लैगिंक अत्याचार करतानाची विडियो क्लिप व्हायरल करेन,  नाही तर तुम्हाला  ठार मारले असं ही धमकी देत आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीवर  वारंवार सामूहिक लैगिंक अत्याचार केलं आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. या संदर्भात नण्यासह आणखी एकाचा शोध सुरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

BDD chal No 20/19 Worli Mumbai-18

Bhayander east