in ,

‘या’ ठिकाणी गणपती बाप्पा चक्क ‘डॉक्टर’ झाले!

भंडारा जिल्ह्यातील मोहगाव देवी गावात गणेशोत्सवातही कोरोना संदर्भात विशेष जनजागृती करण्यात येत आहे. येथील हनुमान व्यायाम मंडळ कोरोना लसीकरण व डेंग्यू संदर्भात जनजागृती करण्याचे काम करत आहे.

या गणेशोत्सव मंडळाच्यावतीने गणपती बाप्पा ‘डॉक्टर झाल्याचा देखावा तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये डॉक्टर, पोलीस, नर्सेस, आशा सेविका यांचं कार्य व त्याचे महत्व सांगण्यात येत आहेशासकीय दिशानिर्देश, विविध सूचना, कोरोनापासुन बचावासाठी शारीरिक अंतराचे महत्व, मास्कचे महत्व, लसीचे महत्त्व आदी गोष्टींचे फलक देखील लावण्यात आलेले आहेत.

विविध सामाजिक संदेशासह गावातील विद्यार्थी आणि युवक यांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बौद्धिक व सांस्कृतिक स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून चंद्रकांत पाटील सत्ताबदलाच्या वावड्या पसरवतात- अमोल मिटकरी

Anant Chaturthi Guidelines | अनंत चतुर्थीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज